माझे फोटो

Saturday 31 March 2012

जसा कळपात हरीणपाडसा

कसा शोधू मी कसा , तुला ग सखे सांगना
हूर हूर मनी भावला असा , जसा कळपात हरीणपाडसा

हरवली सखी साजणी , रानमाळी कुठेच दिसेना
धीरावा धरू मी कसा . हृदय हे वेडावला असा

हे रान सार सुने , सुनी  जाहले हे अंबर घना
फिरावा कुठवर नजरांचा तुंरा, तुला शोधता शोधता

तू नाजूक फुलांचा आरसा , तुज भोवती सुरंग पारध्याचा
लढा मी कसा , द्यावा आत्ता , तुज ठाव ना कुणा

कुठवर पाहू आता , आकाशी पेटला जाळ चांदण्याचा
भडकावा वणवा अन जळावा , तुझ्या विरह रुपी शब्दांचा पेंढा

हे गणा विनवणी तुला , प्रीतीच्या पाखरांचा उडू दे थवा
हूर हूर मनी भावला असा , जसा कळपात हरीणपाडसा - सचिन तळे

Friday 30 March 2012

दऱ्या खोरयातून चाले नार सतरंगी

दऱ्या खोरयातून चाले नार सतरंगी
तिच्या रूपाने , वाजे काळजात प्रीतकिंकारी II धृ II

ती रानमाळाची , नागीण हिरकणी
सांज चांदण्याची , ती लवलवणारी पापणी
मधुभाव संगिनी , तू ग किशोरी
तुझ्या रूपाने , वाजे काळजात प्रीतकिंकारी II १ II

ती फुल रान कळी, निळ्या पलंगाखाली
बोलक्या नेत्राची , ती रानवय गाणी
चंचल मंजुळ , तू ग नवथर लहरी
तुझ्या रूपाने , वाजे काळजात प्रीतकिंकारी  II२ II

ती हिरव्या रानाच , पाखर भिरभिरणार
श्रावण रंगाच , ती  इंद्रासय दरबार
मदन गंधाची , तू ग नाच मयुरी
तुझ्या रूपाने , वाजे काळजात प्रीतकिंकारी II३II

ती लाजाळूची पात , लाजणाऱ्या ओटी
चाफ्याच्या श्रुंगाराची , ती गीत सुमनाची
पुनव चंद्राची , तू ग राघिनी
तुझ्या रूपाने , वाजे काळजात प्रीतकिंकारी II४II - सचिन तळे

Saturday 24 March 2012

माझे शब्द मांडले अनेक

ती मावळून पेटली , वनव्या परी अंग अंग
मी जाळ होऊनी विझलो , घेऊन तिचे छंद अनेक

ती भर उन्हात सावल्यांचा , खेळ मांडते नव्या गीतान
मी त्याच गीतांच्या लहरीचा , छेडीतो  सूर-सेतू अनेक

ती क्षणभर थांबते , घेऊन सुसाट वादळी लाट
मी त्याच वादळावरी , कोरिले चित्र तिचे अनेक

ती रंगाहून रंगते , सजवून श्रुंगार अंतरंग
मी त्याच श्रुंगारात  बुडवली , नशेत रात्र रात्र अनेक

ती प्रीत विझूनी गेली , कळपात नव्या रुपानं
मी त्याच रूपावर , रक्तातून काव्य सांडले अनेक

ती विरली काळजात , विरहाच एक रोप पेरून
मी त्याच पाना पानावरी , माझे शब्द मांडले अनेक - सचिन तळे

Sunday 18 March 2012

राजकारण म्हंटल कि चिड चिड होते …


राजकारण म्हंटल कि चिड चिड होते  …
एक होता कामकरी , कष्टाने रोज रोज घामगाळी , सुखाने खायचा भाकरी , वय होत ६० च्या घरी . भेटला होता वाटेला ,वडाच्या  झाडा कडेला , चेहरा होता तापलेला , कोणावरी  तरी होता चिडलेला. झिजली होती चप्पल जणू चकरा मारून मारून , हाथात होती पिशवी कागदपत्रांनी भरलेली . जाणिले होते मी हि हे मनी , अन विचारले बाबास मी , बाबा म्हणाले ...
राजकारण म्हंटल कि चिड चिड होते , मनात राग हळूच फुलते , उमटते डोळ्यासमोर फक्त ह्या नेत्यांचे चित्रे , कधी न विसरणारे , तेव्हा आठवते ,एक काळी आपणच ह्यांना आदर्श मानले होते , आले होते दारी , घेऊन मतदानाची पोटरी , त्या पोटरीत मत आपणच दिले होते . अनेक रंगाचे झेंडे घेऊन , चिन्हांचे बिल्ले मिरवत , प्रचारात आपणच फिरलो होतो . ताई- माई -आक्का म्हणत बोंबा मारले होतो , एक एक वडापाव वरती सारी भूक होती विजवली .बंक मारले होते , शाळा व कॉलेजचे , कामावरून सुट्टी घेऊन रोज रोज पक्ष्याच्या कार्यालयात रात्र - दिवस होते काडले. घर दार सर्वच होते पेटले , ईतक होत मनात हे राजकारण भिडले .आशा होती त्याची हि निराशा झाली , कोण कुठला तो उमेदवार , बाशिंग लाउनी रिंगणात , जिंकून आल्यावर त्याने हि पाटमोरी दाखवली , आता राजकारण म्हंटल कि खरच चिड चिड होते . 
“ अरे लेकरा ” , नको नको हे राजकारण , जरी म्हणतो बर ते आपल घर दार , तर सकाळ संध्याकाळ , वृत्तपत्रात व टीव्हीवर ह्यांच्याच बातम्या पाहतो , अन चार चौघात , गावाच्या वेशीला , त्यांच्याच रंगत रंगतो , मंग कधी कधी हि राजकारणी भेळ अशी काही तिखट गोड होते कि , मैत्रीत हि गट बाजीचे हळूच मिट पडते. भाव भावाचा होतो वैरी , सत्याच्या खुर्ची पाई , लाल रक्ताचे गुलाल उधळले जाते , भारतीय संस्कृतीच्या करून चिंध्या चिंध्या असे हे राजकारण शिकवले जाते . नको नको म्हणता परत राजकारण च समोर येते . अन सरकारी खात्याच्या हर एका कागदावर , ह्यांचीच गरज भासते , आजू बाजूच्या बडव्यांना चार चारावे लागते . दहा चकरा मारून नंतर मंग हि जीवघेणी सही उमटते . झिजते चप्पल आपली तरी त्यांचीच वाह वाह करयाची असते , ज्याला त्याला सलाम ठोकत , सरकारी काम जे पूर्ण करयचे असते. काय करणार , सरकारी कामाशिवाय कुठलेच पान हालत नाही. रेशनीग खात , जल खात , वीज खात ई . हे विभाग ते विभाग , कंत्राटात  हि त्यांचीच दादागिरी चालते , खरचं राजकारण म्हंटल कि चिड चिड होते
गंभीर होता विषय , विचारात पडले माझे सारे शब्द , कोण बरा ह्याचा दोषी ? विचारले स्वतास मी , तेव्हा कुठे टूब पेटली , अरे मतदार आहे न मी . मंग मीच नाही का ह्यचा  दोषी . सरकार असो वा नसो , रस्त्यावर खडे मात्र कायम आहे , सुविधाच्या नावाखाली असुविधाची शाळा मात्र आहे , शेतकर्याची जमीन विकासाच्या नावाखाली उद्योग -  -पतिच्या पोटी , अन बळीराजा कर्जबाजारी होऊन मात्र फासावर्ती , गाव गावात  विजेचा व पाणीच पत्ता नाही .शाळा व कॉलेजात ट्रस्टी च्या नावाशिवाय जागा नाही . नोकरीत हि वशिले पण नडतो , कोर्टाच्या पायऱ्या चडून चडून सामान्य माणूस थकतो , जितक गुन्हे तुमच्यावर तितके तुम्ही मोटे , सामान्य माणसासाठी सारेच नियम खोटे . कसाब व अफजल ला रोज रोज बिर्याणी अन पोलिसांच्या पदरी  २४-२४ तास रात्र दिन पाळी . परत पाच वर्षाने तेच दिवस उजाडते , हेच सारे प्रश्न घेऊन राजकारणी लोकांची फौज येते ,अन परत मंग एकदा हे राजकारण म्हंटल कि चिड चिड होते.
अन परत मंग एकदा हे राजकारण म्हंटल कि चिड चिड होते.

    - सचिन कृष्णा तळे

भूलण्यास तुझे प्रीत गंध ....


सावरले मनास आज , फुलवुनी नवा साज 
ओंजळीत घेतले फुलास , भूलण्यास तुझे प्रीत गंध …

तू नाही आस पास , नाही आज छळतात तुझे भास
स्पर्श आंधळे झाले , झाली पुसट दोघांची रास
दूर दूर या वाटाण वरती , दिसू  लागली तू अनोळखी
तो फुलण्यास येतो . भूलण्यास तुझे प्रीत गंध ....

का उगाच हा रुसवा , का उगाच हा दुरावा
रुद्यात माझ्या मावळला , आज का तुझा चेहरा
सखे सांग ना कळ्यानस या , फुलेना तुझ्या विना
तो बहरण्यास येतो , भूलण्यास तुझे प्रीत गंध ....
कसे आठवांचे ठसे , पुसले सागराच्या कुशीत
का डोळ्यांतल्या अश्रुचे , वादळ मी केले मुठीत
किती क्षण हे उमटले , विरहाच्या पाना पानात
तो शोधण्यास येतो , भूलण्यास तुझे प्रीत गंध…
आता नको परत प्रेमाचा , फसवा खेळ सारा
एकटाच ह्या काव्यात मी , एकटाच माझा किनारा
पण रुद्यात अजून जळते , तुझ्या भेटीचा विसावा
तो एकांतास येतो ,  भूलण्यास तुझे प्रीत गंध…      - सचिन कृष्णा तळे